शीर्षक सारखा
मी आज abstract बोलणारे
... ह्या खाली दिलेल्या चित्राकडे बघा
..सुंदर, लक्षवेधी, छानसं चित्र..
रंग कुठलेही वापरले
असले, कोणतेही रंग उधळले
असले तरी चित्राची
ठेवण मात्र तीच
राहतेय न.. अ ब्युटीफुल स्प्लाश ऑफ
कलर्स , अ ग्रसफुल
पेंटिंग ! आपल्या मनाचा न
एक ग्रह झालेला
असतो की फुलांचा
रंग नेहमी पांढरा,
निळा, गुलाबी, केशरीच असतो..पण ह्या
पेंटिंगकडे पाहून किती
फ्रेश वाटतंय न,
जणू ह्या फुलांना
अश्या रंगांनी एक
वेगळाच अस्तित्व लाभलाय...वेगळ्या रंगांची उधळण
झालेली दिसली तरी
ह्या फुलांचा अस्तित्व
मात्र टिकून आहे.
आपण ह्या
फुलांच्या रंगानसारखं खूप
काही गृहीत धरतो.
कधी कुणाचा बोलणं,
कधी कुणाचा वागणं
आणि कधी कधी तर आपल्या
माणसांनाच गृहीत धरतो..
ह्या कोमल फुलांवर
होणाऱ्या रंगफेकीप्रमाणे शब्दांची भाडीमाराची, आवाजाची उधळण आपल्यावरही
होत असते...त्याला
प्रतिकार करण्याचा प्रयत्न आपआपल्या
पद्धतीने करत असतो
आपण.. केव्हा केव्हा
तर ही होळी इतका तीव्र
असते की त्यातून
बाहेर पडणे जर कठीण होऊन
बसते... ह्या चित्रातील
बाहेर आलेला माणसाचा
पाय बहुतेक तेच
सांगत असावं...रंगात
रंगायचं पण इतकंही
नाही की तो रंगच
उतरणार नाही...
रंगांच्या शेड्स प्रमाणे
माणसालाही वेगवेगळ्या छटा असतात..
कधी फिका, कधी
मध्यम तर कधी गडद.. रंग
आकाराला घडवतो पण
महत्वाचा म्हणजे रंग
पार्श्वभूमी सजवतात...कुठलीही गोष्ट पार्श्वभूमी
शिवाय पूर्णच होत
नाही, खरंतर गोष्टी
पार्श्वभूमी शिवाय सुरूच
होऊ शकत नाही...
आपण आणि आपला
जीवनही असच एका मोठ्या
कॅनवासवर केलेलं "Abstract " आहे...छोट्या
छोट्या गोष्टीतून मोठा
बनत जाणारं ...(छायाचित्र सौजन्य - गुगल इमेगेस)
No comments:
Post a Comment