Tuesday, April 21, 2015

एकांत आणि बरंच काही…

Solace                एकांत आणि बरंच काही…
                             बैठ्या चाळीत असल्या कारणाने विरंगुळ्यासाठी, मोकळं, शांत वाटून घ्यायचा असलं की कट्ट्यावर किव्हा घराच्या उंबरठ्यावर बसून आठवणीच्या ढगावर नेम धरते मी. आणि काहीही आठवतं, अक्षरशः काहीही ! एखादं गाणं, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचा सहवास, एखादी वस्तू ... काहीही कसाही. आपण एकट असलो की निवांतपणे आठवणींना उजाळा देऊ शकतो कोणीतरी शेजारी असलं की आठवणींचा झूला दोघांच्या पेसनुसार झुलवावा लागतो... Soltitude is the best soulmate एकांताशी एकरूप होऊन कधीकधी आपण रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळा करतो…  प्रोडकटीव एकांत असतो. आठवणींना बहर येतो.. कुठच्या कुठे विचार पोहोचतो...माग अशा वेळी मला "सेलीब्रेशन" नाटकातील वंदना गुप्तेंचा संवाद आठवते जे त्या आपल्या मुलांना सांगतात ,"आठवणींच जंगल खूप विशाल असतं...एकटे गेलात तर हरवून जाल.. सोबत गेलात तर आनंद द्विगुणित होईल"                                                                
                हा सर्व कल्लोळ मनात सुरु असताना अनपेक्षित पाऊस कोसळतो.. न सांगून येणाऱ्या पाहुण्यासारखा .. आणि आठवणींना एक वेगळीच दिशा मिळते, एक वेगळाच angle मिळतो... खड्ड्याच्या रस्त्यावर चाललेली गाडी जेव्हा सरळ, स्मूथ रस्त्यावर आल्यावर जो आनंद होतो न अगदी तशी भावना पावसाच्या आगमनाने मनात येते. असं म्हणतात आवाज मनाला विचलित करतात, शांतता भंग करतात ... पण पावसाच्या आवाजात जादू असते.. सर्व काही जुळवून आणण्याची.. मनाला शांत करण्याची.. मग हळूच आपण रिमझिम गिरे सावन ऐकतो, तर कोणी चिम्ब भिजलेले गातं, तर कधी वारा गायी गाणे म्हणत भिजून गेलेल्या वार्याला अनुभवत.. रणरणत्या उन्हात तुमच्यावर थोडासा शब्दमयी पाण्याचा शिडकावा केला :p  थोड्या वेळाने पाऊस थांबतो पण मी मात्र पावसाच्याच आठवणीत अजूनही भिजलेली असते...त्याच्यातच गुंतलेली.. आयुष्यातही अशी माणसं असतात ज्यांच्या आपल्यासोबतचा प्रवास तसं पाहायला गेलं तर थोड्याच दिवसांचा अथवा वेळेचा असतो.. ती येतात पावसासारखी.. त्यांच्या जाण्याचा नेम नसतो... असला तरी surprise देतात कधी कधी.. असली तरी कायम नसतात... नदीसारखी असतात ...मनाला स्पर्शून पुढे जाणारी :)
                                                                   - अपूर्वा     
छायाचित्र सौजन्य -नओमी सिल्वर आर्ट्स (गुगल इमागेस )

Saturday, April 18, 2015

शब्द

            शब्दांविषयी बोलावं तेवढं कमीच आहे !! कोणत्याही लिपीचा मूळ घटक आहे शब्द .... शब्दांनी किमया करावी असा कित्येकांना वाटतं .... प्रत्येकाला जमतच असं नाही .... पण ज्यांनी किमया साधली आहे त्यांचे शब्दही आपलं आयुष्य चांगलंच समृद्ध करू शकतात ...... अशा गूढ शब्दांबद्दल .......


बोलण्याचा मोह आहे
शब्दांचा मोठा डोह आहे
मार डुबकी त्या डोहात
ज्यात अगणित कांतीचे ओज आहे......

लिहिण्याची तलफ आहे
शब्दांचा तालमय डफ आहे
मार थाप त्या चामड्यावर
ज्यात शाहिराचा अजरामर पोवाडा आहे .....

वाचण्याची गरज नितांत आहे
शब्दांमध्ये ताकद अनंत आहे
घे अनुभव त्या ताकदीचा
ज्यात चिरंतन साहित्य सामावलं आहे....

पाहण्याचा मानस आहे
शब्दमय धुकं पांघरलेली दुनिया आहे
फिर ... पहा .... घे अनुभव त्या धुक्याचा
ज्यात गुलाबी थंडी अन गारवा आहे.....

जगण्याची इच्छा आहे
शब्दांचं तर जगणंच अमर आहे
कर स्पर्श त्या अमरत्वाच्या सुवर्णपटाला
ज्यात आयुष्य समृद्ध करणारा परिस आहे .....


                                           - विश्वजीत




Friday, April 10, 2015

शोध

                                           खूप काही चाललेलं असतं .... खूप काही घडत असतं .... या चराचरात.... डोळे उघडे ठेऊन जर बघितलं तर खूप काही दिसतं.... बऱ्याच गोष्टी ... काही गूढ, काही अनाकलनीय तर काही बुद्धीच्या पलीकडे ...... पण एक जाणवलेलं सत्य असं की काही बघण्याचा, त्यातून काही चांगलं शोधण्याचा दृष्टीकोन एकदम बोथट झालाय .... प्रत्येक गोष्ट डोळसपणे बघून त्यातल्या चांगल्या गोष्टी टिपून घेणं आवश्यक आहे ......


बघ, शोध या डोळ्यात
एखादा क्रांतीचा विस्तव
अंधाधुंद फसवाफसवीच्या जगात
प्रामाणिकतेची ज्योत पेटवायला

बघ, शोध एक माणूस
माणुसकी हरवलेल्या समाजात
नवविचारांची मुहूर्तमेढ रोवायला
बुरसटलेल्या रूढी परंपरा विसरून जायला

बघ, शोध एक शब्द
धूळ खात पडलेल्या पुस्तकांत
भावना हरपलेल्या लोकांमध्ये
भावनेचे अमृत ओतायला

बघ, शोध एक कुंचला
शतकोशतकांच्या चित्रांत
रंग विसरलेल्या आयुष्यांत
नव्याने रंगांची उधळण करायला

बघ, शोध एक विचार
शुद्ध आचारांची जोड असलेला
यांत्रिकतेच्या सापळ्यात सापडलेल्यांच्या
गुदमरलेल्या हृदयाचे कुलूप तोडायला

बघ, शोध एक स्वप्न-अपेक्षांचा गरुजराज
उंचच उंच भरारी घेणारा
उडणे विसरलेल्या पंखांमध्ये
स्वछंदाचे बळ भरायला ....

                                             
                                                - विश्वजीत



Friday, April 3, 2015

ट्रेन निघाली

                                                                           ट्रेन निघाली
               रोज गोरेगाव ते दादर अशा सध्या ट्रेनच्या प्रवासात नवलाई वाटते ती आमच्या लेडीज डब्ब्यात नेहमी होत राहणाऱ्या कधीही थांबणाऱ्या गप्पांची... गाडी भरत जाते तशाच गप्पा ही रंगतात आणि इतक्या रंगतात कि स्टेशन आलं तरी बाय म्हणवत नाही आणि ब्रिज वर चढताना ही त्या गप्पा सुरूच असतात...
            ट्रेन येण्याआधी गप्पा, ट्रेनमध्ये चढल्यावर गप्पा, उतरतानाही बडबड आणि कधी कधी उतरल्यावरही बडबड सुरूच असते.. कोण सुखाची बातमी देत तर कोण दुःखाची वार्ता... गप्पांचा स्वर-ताल काळानुसार, वयानुसार वरखाली होतो पण ओघ मात्र तोच राहतो... म्हणजे बघा दोन विवाहित बायका आपल्या सासूबद्दल ज्या तन्मयतेने बोलतात तितक्याच आत्मीयतेने दोन वृद्ध महिला आपल्या सुनांबद्दल एकमेकांना  सांगतात.. तर दोन मैत्रीणीचं गोस्सीप सुरु असतं किव्हा फोनवरील गप्पा सुरु असतात … तर काही गप्प असून दुसर्यांच्या गप्पांचा कानोसा घेतात आणि निमित्त मात्र candycrush  असतं.
                           ही गप्पांची उस्फूर्त लोकल पुढे सरसावते तसा बोलण्याला वेग येतो. कधी कधी सुरेल मैफिलही जमते. गाडीचा वेग वाढतो तसा गप्पांचा वेग वाढतो आणि ट्रेनचा वेग मंदावला किव्हा मधेच थांबली जरी तरी बोलण्याला थांब नसतो...म्हणजे भौतिक शास्त्राच्या सिद्धान्तासारखा “intensity of talk remains same irrespective of the speed of the train” :p  
             ही गप्पांची विरंगुळ्याची लोकल पुढे धावते ...गप्पा, बडबड, कटकट काहीही म्हणा बोलण्याने ती लोकल कशी जिवंत वाटते. नवीन नाती जोडली जातात, मग एक ग्रुप ही बनतो आणि हळू हळू ह्याची सवय होऊन ही  माणसा आपल्या जवळची होऊन बसतात. आपल्यातल्या काही लोकांना ही बडबड, ह्या गोष्टींची  कटकट वाटत असेल पण कुणास ठाऊक त्यांना त्याचं बोलण शेअर करण्यास कोण नसेल ही ! असूनही नसेल ! मग जाणवतं की लोकल सोबतही बोलण चालू असावा...forever ..stay connected  :)
                                                                    - अपूर्वा