खूप दिवसांनंतर ब्लॉग वर काहीतरी लिहायला वेळ मिळाला (काढलाच म्हणा) .... अचानक आलेल्या शिथिलतेचा इथेच खंड करून नवीन उर्जेने पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे.
ही कविता आपली माती, आपली नाती, आपली माणसं या सर्वांना अर्पण. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्फूर्तीला सलाम. काळाच्या ओघात पुढे जात असताना काही मुलभूत प्रश्न मांडण्याचा आणि त्याद्वारे माणुसकीच काय होईल याचा आपण सर्वांनीच विचार करणे क्रमप्राप्त आहे.

स्पंदनांची
बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
हृदयाला धडधडण
याच्या पलीकडंही
खूप काही ठाऊक
असतं
जाणीवेचा प्रतिबिंब
असतं हृदय ... हे आता
समजावेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
बीजाला पेरण
खतपाणी देणं
फुटलेल्या अंकुरची
जीवापाड काळजी घेणं
या जगात हे
सारं
शिकवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
सारंकाही ठीकठाक
म्हणता म्हणता
अचानक्तेचा
गौप्यस्फोट
होता होता
सावध राहण्याची गरज
सांगेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
जगणं दुसऱ्यांसाठीच
बाळकडू देणारं
"स्व”तःच्या
खिडकीपलिकडच
नयनरम्य दृश्य पाहण्याचं
प्रवाह विचारांच्या अशा
टिकवेल का कोणी...
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
जन्माचं कारण
शून्याचा उगम
अस्ताच प्रारब्ध
न उलगडणारी रहस्य
आता उलगडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
सजीव असण्यामागच
प्रेम करण्यामागच
मायेच्या ओलाव्याने
जवळ घेण्याचं
गणित सोडवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
स्पंदनांची
बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी
?
- विश्वजीत
No comments:
Post a Comment